चीनचे सैनिक तिबेटमधे घुसतात आणि अनेक प्राचीन मंदिरांचा - गूढ ठिकाणांचा विध्वंस आरंभतात. त्या मोहिमेत त्यांच्या हाती एक प्राचीन संस्कृत हस्तलिखित पडतं. त्यात लिहिलं असतं, भारतात एका गूढ ठिकाणी अशी एक वस्तू आहे की जी हाती आल्यावर संपूर्ण विश्वाची रहस्यं उलगडतील. मनुष्य विश्वावर ताबा मिळवू शकेल. कर्मधर्मसंयोगानं त्या वस्तूचा ठावठिकाणा चिनी लोकांना लागतो आणि सुरू होतो एक जीवघेणा पाठलाग. एक गट निघतो ती वस्तू मिळवायला आणि दुसरा त्या वस्तूचं विसर्जन करायला - बिंदूसरोवरात! कुठे आहे ते बिंदूसरोवर? कोणती रह्स्य त्यात दडली आहेत? ते जाणून घेण्यासाठी ही कादंबरी वाचली पाहिजे! Published by Mehta Publishing House. https://www.mehtapublishinghouse.com/book-details/BINDUSAROVAR/3136.aspx